अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान १५ दिवसात खात्यात जमा होणार 3 हेक्टर पर्यंत मदत

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान १५ दिवसात खात्यात जमा होणार 3 हेक्टर पर्यंत मदत

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची अनुदान शेतकऱ्यांना आता १५ दिवसात खात्यात अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना ग्रहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांना त्वरित वितरीत करण्याचे आदेश दिली आहे.

राज्यात तीन दिवापासून सतत अवकाळी पाऊस पडत आहे यामध्ये शेतकऱ्यांनी पेरलेल्या रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे.

अनेक शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांचे पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

तीन दिवसात राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने यांत डाळिंब, मोसंबी, द्राक्ष यासह विविध पिकाचे मोठे नुकसान झाले

पुढील १५ दिवसात खात्यात अनुदान जमा होणार

मागील वर्षी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान १५ दिवसात शेतकऱ्यांना देण्यात यावे पिक विमा संदर्भात कुठलीही तक्रार असल्यास तात्काळ पंचमाने करून शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा असे ग्रहनिर्माणमंत्री यांनी सांगितले.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच शासन निर्णय घेण्यात येईल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे २ हेक्टर एवजी 3 हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *