Crop Insurance Payout शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ३ हजार १७५ कोटी रुपयांची विमा भरपाई मिळणार आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरअंतर्गत ही भरपाई मिळणार आहे. त्यापैकी आतापर्यंत १ हजार ४७३ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. तर उरलेली भरपाई आठवडाभरात खात्यात जमा होईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.
राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरअंतर्गत भरपाई विमा कंपन्यांनी द्यावी, असा नियम आहे. राज्याने दुसरा हप्ता दिल्यानंतर काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई मिळते. राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रीगरमधून विमा भरपाई मिळत आहे. Crop Insurance Payout
स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही ट्रीगर अंतर्गत शेतकऱ्यांना द्यावयाची भरपाई निश्चित होत आहे. तसेच ही भरपाई खात्यात जमा होण्यालाही सरुवातही झाली आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना एकूण ३ हजार १७५ कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी २ हजार ४६७ कोटी रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून मिळणार आहेत. तर ७०८ कोटी रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रीगरमधून मिळणार आहेत. Crop Insurance Payout
मागील आठवडाभरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा होण्यालाही सुरुवात झाली. शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या एकूण ३ हजार १७५ कोटी रुपये भरपाईपैकी १ हजार ४७३ कोटी रुपये विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. तर उरलेले १ हजार ७०२ कोटी रुपये पुढील आठवडा भरात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असे कृषी विभागाने सांगितले.
पीक विम्याची एकूण भरपाई (कोटीत)
२,४६७ कोटी
स्थानिक आपत्ती
७०८ कोटी
हंगामातील प्रतिकूल परिस्थिती
३,१७५ कोटी मंजूर
एकूण भरपाई
भरपाईची स्थिती
३,१७५ कोटी
मंजूर भरपाई
१,४६७ कोटी
वितरित भरपाई
१,७०२ कोटी
प्रलंबित भरपाई